Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या क्लीन चीटवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, आता फक्त दाऊद इब्राहिमलाेड देण्याची बाकी आहे
•उंदराचे काळीज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ईडीच्या भीतीने पळून गेले ; खासदार संजय राऊत
मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट देण्यात आली. त्यांच्यावर गैरसमजातून गुन्हा आता फक्त दाऊद इब्राहीमलाच क्लीनचिट द्यायचे शिल्लक आहे. मोदींच्या आणि राज्यातील सरकारमध्ये आणखी काय होणार. हे कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच उंदराचे काळीज असलेले शिंदे, अजित पवारही घाबरून पळून गेले अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आज प्रसार माध्यमांशी संजय राऊत बोलत होते.
मात्र आमच्यावरचेही गुन्हे मागे घ्यावे. आमच्याही मालमत्ता सोडवल्या पाहिजेत. आम्ही पक्षात येत नाही म्हणून आमच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. किरीट सोमय्या फडतूस माणूस आहे. त्यांनी आता वायकरांच्याबाबत बोलावे. ते जर खऱ्या बापाचे, सत्य वचनी असतील तर यावर बोलावे. वायकर यांच्यासारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जात आहे त्यावर बोलावे”, असे संजय राऊत म्हणाले
तसेच पुढे त्यांनी म्हंटले आहे की, “आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना पक्षात घेतले. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.आमच्यासारखे काही लोक त्या दबावाला बळी पडले नाहीत. मात्र काहींचे काळीज उंदराचे आहे. अजित पवार, मुख्यमंत्री याच ईडीच्या कारवाईला घाबरून पळून गेले. भाजपने भीती दाखवायला खोटे गुन्हे दाखल केले”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार तसेच शुक्रवारी महाविकास आघाडीची बैठक झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते म्हणाले, “आमची बैठक झाली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात बैठकीला होते. विधानसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत. 288 जागांवर तयारी सुरू आहे. जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. तिन्ही पक्षांची 288 जागांची तयारी आहे”, असे राऊतांनी सांगितले.