ठाणेमुंबई
Trending

Uran Fire News : उरणमधील ‘ओएनजीसी’ प्रकल्पाला भीषण आग; परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट

Uran Latest Fire News : नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्रात आग, अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु

उरण :- उरणमधील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या ओएनजीसी (ONGC) प्रकल्पाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे आणि आगीचे मोठे लोळ दिसत असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग विझवण्यासाठी सीआयएसएफ (CISF) आणि अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. Uran Latest News

सविस्तर माहितीनुसार, आज सकाळी उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात अचानक ही आग लागली. प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र असल्यामुळे आगीची तीव्रता जास्त असल्याचे बोलले जात आहे. आगीचे वृत्त मिळताच, प्रकल्पाच्या प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. कोणताही विलंब न करता अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे.

या दुर्घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून, त्यात आगीचे रौद्ररूप दिसून येत आहे. आगीच्या धुराचे आणि आगीचे लोट दूरवरूनही दिसत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आग आणखी वाढून अधिक गंभीर स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता, आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित असून, त्यांनी परिसरातील वाहतूक आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0