Sanjay Raut : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील हल्ल्याबाबत संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप
Anil Deshmukh attack Sanjay Raut’s allegations against Devendra Fadnavis: शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.
मुंबई :- शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगानंतर या हल्ल्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा स्टंट असल्याचा आरोप करत आहे. मात्र आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे स्टंट करण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
देशमुखांचे चिरंजीव निवडून येत आहेत. त्यामुळेच हल्ला झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही भारतीय जनता पक्षाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावे, असे वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हते. हेच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे
राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्यावर शिवसेना सोडण्याची वेळ आली आहे, कधी ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात, कधी शिंदे यांची स्क्रिप्ट वाचतात. राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचत आहेत. ते कधी नारायण राणे कधी देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट वाचत असतात. शिवसेनेच्या बाबतीत त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र फार गंभीर्याने घेतोय, असे दिसत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.