Sanjay Raut On Best Election : ‘माझ्याकडे माहिती नाही’ म्हणत राऊतांनी टोलवले प्रश्न; म्हणाले, ‘पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही.’
मुंबई :- बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊनही या निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. या पराभवावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut On Best Election यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सुरुवातीला ‘माहिती नाही’ म्हणत बोलणे टाळले. मात्र नंतर त्यांनी या पराभवाचे खापर पक्षावर फोडण्याऐवजी, ‘ही काही मोठी परीक्षा नाही’, असे म्हणत पक्षाचा बचाव केला.
“बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर कोण जिंकले? माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही,” असे सुरुवातीला राऊत म्हणाले. “ही स्थानिक निवडणूक आहे. मला खरोखरच माहिती नसेल तर प्रश्न विचारू नका. मी माहिती घेऊन बोलेन,” असे म्हणत त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच सुनावले.
‘ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही’
नंतर मात्र त्यांनी या निवडणुकीचे महत्त्व कमी लेखत पक्षाचा बचाव केला. “पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही, चाचणी परीक्षा नाही,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. या निवडणुकीत शरद राव यांच्या युनियनला नेहमीच यश मिळाले आहे. या निवडणुका पक्षीय बळावर लढल्या जात नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपराष्ट्रपती निवडणुकीवरून मोदी सरकारवर टीका
यावेळी संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजप आणि एनडीए आघाडीकडे पुरेसे बहुमत असतानाही, दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना फोन करून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली. यावर राऊतांनी जोरदार टीका केली.
“जर तुमच्याकडे बहुमत आहे, तर फोन का करावा लागतो? याचा अर्थ तुमचे बहुमत अस्थिर आणि चंचल आहे,” असा सवाल राऊतांनी विचारला. “उमेदवार ठरवतानाच ही अक्कल तुम्हाला यायला पाहिजे होती. सर्व पक्षांशी चर्चा केली असती, तर सर्वसंमतीने नाव पुढे आले असते,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या एकतर्फी निर्णयावर ताशेरे ओढले.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…