Sanjay Raut : रवींद्र वायकर लोकसभेत जाऊ शकणार नाहीत, 48 मतांनी विजयी जागेवर संजय राऊतांचा मोठा दावा
•मुंबई उत्तर पश्चिम खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती वाटते.
मुंबई :- लोकसभेच्या उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवरून वाद सुरूच आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे नेते नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर लोकसभेत पोहोचणार नाहीत.राऊत म्हणाले, “हे वायकर पूर्वी शिवसेनेत होते. आमच्या पाठिंब्याने ते आमदार झाले, मंत्री झाले, बीएमसीचे स्थायी अध्यक्ष झाले आणि आता ईडी आणि सीबीआयच्या भीतीने ते पळून गेले. आम्ही पळून गेलो नाही, तो आम्हाला ज्ञान का देतोय?संजय राऊत म्हणाले, “आम्ही ईव्हीएमला नव्हे तर यंत्रणेला दोष दिला आहे. वायकर चोरी करून निवडणूक जिंकतात, हा पूर्ण बोगस खेळ आहे. रवींद्र वायकर लोकसभेत जाणार नाहीत.
संजय राऊत याबाबत बोलतांना म्हणाले, “कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पहावे. लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं तरी तो वाघ होत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे हेच करत आहेत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे शिंदे मिंधे, मधून उपटले कुठून ? हे जे उपटे आहेत, त्यांना यांना भाजपने आणलं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, “पैशांनी मतं विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणं याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत. शिवसेना अशा प्रकारे फोडणं हे मोघलांनंतर महाराष्ट्रावरचे सर्वात मोठे आक्रमण आहे”, असा हल्ला राऊतांनी चढवला आहे.
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरूनही राऊतांनी भाष्य केले आहे. हा एक हास्यास्पद प्रकार आहे. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना असा ठाम पुनरुच्चार राऊतांनी केला. 58 वर्षांपूर्वी हिंदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे.तेव्हापासून माझ्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेतला. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, तुरूंगवास भोगला. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवले”, असे राऊत म्हणाले.