मुंबई

Sanjay Raut : राज ठाकरेंनी आम्हाला मराठी शिकवू नये, आम्ही ज्या हेडमास्टर कडे शिकलो त्याचं नाव “बाळासाहेब ठाकरे”!

Sanjay Raut On Raj Thackeray : भाजपसोबत जाण्यासाठी गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पाच बैठका ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दावा

मुंबई :- खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांच्यावर पलटवार केला आहे.विक्रोळीच्या सभेत मनसेने संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली होती. राजकीय भाषा कशी असावी, हे ऐकण्यासाठी राऊतांनी यावं, म्हणून मनसेकडून ही खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंनी आधी स्वत:ची भाषणं ऐकावी, पहावी. कळेल त्यांना. त्यांनी आम्हाला भाषा शिकवू नये. खासकरुन मराठी भाषा शिकवू नये. आम्ही ज्या हेड मास्टरकडे शिकलो, त्यानंतर मराठीत असा कुणी हेड मास्टर झाला नाही, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

उद्धव ठाकरे यांनी अदानींसोबत हातमिळवणी केली असती तर आमचे सरकार पडले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपसोबत जाण्यासाठी गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पाच बैठका झाल्या असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या या दाव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या बैठकांना शरद पवार नव्हे तर अजित पवारच उपस्थित असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. गौतम अदानी यांना मुंबई मिळवायची असल्यानेच ठाकरे सरकार पाडण्यात आले, अशी कबुली अजित पवार यांनी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही गौतम अदानींसोबत हातमिळवणी केली असती तर आमच्या बॅगेतही पैसे निघाले असते. मात्र, आम्ही त्यांच्यासोबत हातमिळवणी केली नाही. त्यामुळे आमच्या बॅगेत पैसा निघत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, जिथे पैसे पोहोचवायचे होते, तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी पैसे पोहोचवले आहेत. पैशांचे वाटप देखील सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वस्तूंचे वाटप करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा बॅग तपासणीचा व्हिडिओ हा विमानतळावरचा आहे. विमानतळावर सर्वांच्या बॅगांची चेकिंग होते. हे लोक काय बोलतात, त्यांनाही समजत नाही. विमानतळावर तर पंतप्रधान जरी गेले तरी त्यांच्या बॅगेची देखील तपासणी होते. तिथे स्कॅनिंग मशीन असते. त्यांना काय बोलतात हे समजत नाही. निवडणूक आयोग हे शहा आणि फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0