Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य दळभद्री…. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची टीका
Sanjay Raut Reply PM Modi : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्यावर संजय राऊत यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया
मुंबई :- बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी PM Modi यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत Sanjay Raut यांनी घेतला. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर BJP चांगलीच टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे टार्गेट करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे असे म्हणले होते त्यावरही संजय राऊत यांनी चांगलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.”संजय राऊत पुढे म्हणाले, “हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे.” Sanjay Raut Reply PM Modi
मोदी आणि शहा महाराष्ट्रावर हल्ले करतात, महाराष्ट्र लुटण्याचा तोडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी औरंगजेबाचे विधान केले. मी वैयत्तिक कोणावरही टीका केली नाही. जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू असे मी म्हंटले होते. ज्या ठिकाणी औरंगजबाचा जन्म झाला त्या दिल्लीचे वारे लागले असेल. जे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणतात ते औरंगजेबाचेच वंशज आहेत. या औरंगजेबाच्या संतानांनी तेलंगणात महाराष्ट्राविषयी असे विधान करणे योग्य नाही”, अशा हल्ला राऊतांनी चढवला आहे. Sanjay Raut Reply PM Modi