Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांच्याकडून एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवैसी यांची पाठराखण
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रसार माध्यमाचे संवाद साधताना म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे. तसेच शपथविधीच्या कार्यक्रमात खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या जय पॅलेस्टाईन नारावर संजय राऊत यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे.
बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चालली. मात्र आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही. तसेच अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करुन जामीन रद्द करुन घेतला”, असा आरोप राऊतांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून परंपरा आहे की, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. लोकसभा अध्यक्षपदावर बसल्यावर ते कोणत्याही पक्षाच राहत नाही. पण गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे हुकूम मानणारे लोकं त्याठिकाणी बसतात. फार मोठी परंपरा त्या पदाला असली तरी ती भारतीय जनता पक्षाने मोडून काढली आहे. आधीच्या लोकसभेत एकाच वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांना जाणीवपूर्वक लोकअध्यक्षपदावर पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाही राऊतांनी चढवला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांच्याबाबत बोलतांना राऊतांनी म्हंटले आहे की, “पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?”, असे संजय राऊत म्हणाले.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…