मुंबई

Sanjay Raut : “डुप्लिकेट लोकांसोबत सत्ता! फडणवीसांच्या ऑफरवर संजय राऊतांचा स्फोटक पलटवार”

Sanjay Raut On Devendra Fadnavis : फडणवीसांचा ‘स्कोप’चा टोमणा म्हणजे टपली-टिचकीच – राऊतांची टीका

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना “तुमच्यासाठी इकडे येण्याचा स्कोप आहे” अशी दिलेली थेट ऑफर आता चांगलीच गाजू लागली आहे. Sanjay Raut On Devendra Fadnavis फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र आणि स्फोटक प्रतिक्रिया देत भाजपवर खरमरीत टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “फडणवीस हे टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. हे वक्तव्य एखादा विनोदी टोमणा आहे, त्यात गांभीर्य शोधू नका.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “शिवसेना सध्या सुप्रीम कोर्टात नाव व चिन्हासाठी लढा देत असून, आमचा पक्ष अस्सल आहे — बाकी सगळे डुप्लिकेट!”

“डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी – हीच सत्तेची सोबत?”

राऊतांनी भाजपवर थेट हल्ला चढवत म्हटलं, “फडणवीस सध्या डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीसोबत सत्ता भोगत आहेत. त्याला कुठलाही वैचारिक अथवा नैतिक पाया नाही. अशा स्थितीत त्यांनी आमच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे.”

“याला मी ऑफर म्हणत नाही, ही फक्त टपली आहे,” असे स्पष्ट शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “राजकारण चंचल असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण अशा अस्थिर वास्तवात ‘2029 पर्यंत स्कोप नाही’ म्हणणं हास्यास्पद आहे,” असेही ते म्हणाले.

कालच्या फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये दिसले, मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद साधलेला नव्हता. यावर राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या मांडीवर बसावं अशी अपेक्षा होती का? गद्दारांसोबत हस्तांदोलन करायचं नसतं, महाराष्ट्राने हे पाहिलं आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी हेही उघड केलं की, उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. “काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा कालच फोन आला होता. इंडिया आघाडीची बैठक लवकरच होईल. यावेळी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केलं.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago