दिल्लीत मराठीचा डंका! Maharashtra Breaking News : ‘श्यामची आई’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

Shyamchi Aai Got Best Marathi Film National Award: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, अमृता अरुणराव यांनी नऊवारीने वेधले लक्ष
ANI :- राजधानी दिल्लीत पार पडलेल्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव पाहायला मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ ठरला. Shyamchi Aai Got Best Marathi Film National Award हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘श्यामची आई’साठी अमृता अरुणराव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी खास महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या संस्कृतीचा सन्मान केला, ज्याचे सर्वांनी कौतुक केले.
काय आहे ‘श्यामची आई’ चित्रपट?
हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजींच्या बालपणावर आधारित आहे. एका आईचे तिच्या मुलावर असलेले प्रेम आणि संस्कारांचे महत्त्व यात अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. अमृता फिल्म्स, पुणे फिल्म कंपनी, भालजी पेंढारकर आणि आल्मंड्स क्रिएशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झालेल्या मूळ ‘श्यामची आई’ या चित्रपटावर आधारित आहे.
इतर विजेत्यांचा सन्मान
या पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा, तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच, ‘12वी फेल’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’चा, सान्या मल्होत्राच्या ‘कटहल’ ला ‘सर्वोत्तम हिंदी फिचर फिल्म’चा आणि अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’साठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना ‘सर्वोत्तम दिग्दर्शना’चा पुरस्कार मिळाला. अभिनेता मोहनलाल यांचा मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


