मुंबई

Sanjay Raut : अहमदाबाद विमान अपघातावरून संताप — “ही केवळ दुर्घटना नाही, सरकार जबाबदार!”

Sanjay Raut Latest News : खासगीकरण सरकारने केले, जबाबदारीही त्यांचीच घ्या – संजय राऊत यांचा सवाल

मुंबई | अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut Latest News यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. “जवळपास 300 नागरिकांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेला केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, याची जबाबदारी सरकारने घ्यावी,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“एअर इंडियाचे खासगीकरण हे सरकारनेच केले आहे. त्यामुळे यामध्ये झालेल्या व्यवस्थात्मक चुकांची जबाबदारीही सरकारनेच स्वीकारली पाहिजे,” असे राऊत म्हणाले. विमान अपघाताची चौकशी होणार असली तरी सत्य बाहेर येईल याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी सूचित केले.

त्यांनी लक्ष वेधले की, यूपीए सरकारच्या काळात ‘ड्रीमलायनर’ विमानांचा सौदा झाला तेव्हा भाजपनेच त्यातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी विमानाच्या सुरक्षेवर संशय घेतला गेला होता, मग आता ती गडबड मिटली का? असा प्रश्नही त्यांनी केंद्राला विचारला.

“राजीनामा मागण्याची गरज नाही, पण जबाबदारी स्वीकारा,” असे सांगताना राऊत म्हणाले की, आम्ही रेल्वे अपघातावेळी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागतो, दहशतवादी हल्ल्यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतो – पण हे सरकार कुठल्याच प्रसंगी जबाबदारी घेत नाही.

अमित शहा यांच्या “अपघात टाळता येत नाही” या विधानावरही राऊतांनी टीका केली. “रेल्वे अपघात, दहशतवादी हल्ले, विमान दुर्घटना, मणिपूरमधील दंगली… काहीच टाळता येत नाही तर मग काय टाळता येतं?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेवटी, संजय राऊत यांनी स्मरण करून दिलं की, पूर्वी भाजपच अशा घटनांनंतर मंत्र्यांचे राजीनामे मागत असे आणि ते प्रत्यक्षात देण्यातही येत. मात्र आता त्याच पक्षाने मौन धारण केले आहे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

vivek

Recent Posts