Sanjay Raut On BJP : “हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?” राऊतांचा सवाल; मुंबईचा महापौर मराठीच होणार या भूमिकेवर शिवसेना (UBT) ठाम!
मुंबई | मुंबई महानगरपालिकेचा Mumbai BMC Election आगामी महापौर कोण होणार? या प्रश्नावरून राजकीय वातावरण पेटले असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या ‘हिंदू महापौर’ कार्डावर जोरदार प्रहार केला आहे. “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि इथे फक्त ‘जय महाराष्ट्र’च चालणार,” अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या रणनीतीला उत्तर दिले आहे.
“आम्हाला हिंदुत्व शिकवू नका!”
भाजपकडून मुंबईचा महापौर ‘हिंदू’ होईल, असे सांगण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर राऊत भडकले. ते म्हणाले, “हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? बाळासाहेब ठाकरेंनी याच मुंबईतून हिंदुत्वाचा लढा सुरू केला, हे विसरू नका. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे. ‘जय श्रीराम’ आमच्या हृदयात आहेच, पण मुंबईत ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘जय महाराष्ट्र’ हाच नारा चालणार. उगाच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका.”
‘मराठी’ अस्मितेचा पुनरुच्चार
राऊत यांनी ऐतिहासिक दाखले देत मुंबईच्या मराठी अस्मितेवर भर दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, पण ते मराठी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, ते मराठी होते. मग मुंबईचा महापौर मराठी का नसावा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृपाशंकर सिंह यांच्या ‘उत्तर भारतीय महापौरा’च्या विधानानंतर राऊत यांनी ही भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे.
स्टार प्रचारक आणि ‘मुंबई वाचवा’ची हाक
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवण्याच्या निर्णयावरही राऊतांनी टीका केली. “बाहेरून लोक मुंबईत येऊन ती विकण्याचा आणि तिचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही, तर ‘मुंबई वाचवण्यासाठी’ चाललेली लढाई आहे,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
सरसंघचालकांनाही टोला
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जिथे राहता तिथली भाषा शिका’ असे विधान केले होते. त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “भागवत म्हणतात ते बरोबर आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असूनही ते नेहमी हिंदीतच का बोलतात? त्यांनी स्वतःही मराठीत बोलले पाहिजे आणि संघाचा सर्व कारभार मराठीतूनच चालवला पाहिजे.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…