श्रीनगरमध्ये ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ यशस्वी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः केले रक्तदान

DCM Eknath Shinde : सैन्यदलाच्या जवानांप्रती कृतज्ञता, सांगलीतील एक हजार पैलवानांचा सहभाग; ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाबद्दल खास आदरांजली
सांगली :- ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशस्वी कामगिरीबद्दल भारतीय सैन्यदलाचे आभार मानण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) श्रीनगर येथे भव्य ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ आयोजित केली. या विशेष प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी स्वतः रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सांगलीतील शिवसेना नेते चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पैलवानांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.


रविवारी सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 92 बेस रुग्णालयाला भेट दिली आणि जवानांना आदराने सलाम केला. यावेळी त्यांनी रक्तदान करून एक आदर्श घालून दिला. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले, “तुम्ही सीमेवर दक्ष असल्यामुळेच आम्ही देशात सुखा-समाधानाने जीवन जगू शकतो.
या महारक्तदान यात्रेचे आयोजन ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचे प्रतीक म्हणून करण्यात आले होते. सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान या शिबिरात सहभागी झाले. त्यांनी सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करत रक्तदान केले. या अनोख्या उपक्रमाने देशाप्रती आणि सैनिकांप्रती लोकांच्या मनात असलेली आदराची भावना पुन्हा एकदा दिसून आली.


