Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका
•नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका….. Sanjay Raut
मुंबई :- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यापूर्वी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत विधानसभेत केलेले भाषण ऐकावे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सध्या राज्य गुंडांच्या ताब्यात आहे. हे सर्व संगनमताने सुरू असून याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा हल्लबोलही त्यांनी केला. आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
महायुतीकडून दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत यामिनी जाधव आपला अर्ज दाखल करणार आहेत. यवारूनच राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “फडणवीस आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. तिथे जाण्यापूर्वी विधानसभेत त्यांनी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत केलेले भाषण ऐकावे आणि स्वतःला आरशात बघावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका मांडावी लागते. ते नकली का आहेत. त्यांना असे का करावे लागले, हे स्पष्ट करण्याची गरज आहे. मोदी आमच्याकडे खिडकीतून बघत आहे. त्यामुळे निवडणुकांचे निकाल काय असतील, याची कल्पना येत आहेत. आता त्यांनी कितीही खुणावेले तरीही इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष जाणार नाही. आम्ही निवडणूक जिंकणार असून इंडिया आघाडीच सत्तेवर येणार आहे”, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.