Sanjay Raut : आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही ; खासदार संजय राऊत
![Sanjay Raut](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/images-60.jpeg)
Sanjay Raut On MLA Suresh Dhas : बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले? ; खासदार संजय राऊत यांचा सवाल
मुंबई :- मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणा बाबत सातत्याने आवाज उचलणाऱ्या आमदार सुरेश धस MLA Suresh Dhas यांनी काही दिवसात पूर्वी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांची भेट ही राजकीय नसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस बाबत असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांच्या या भेटीनंतर राजकीय पडसाद चांगलाच उमटले. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या भेटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात सौदा झाल्याचा आरोप केला त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच भेटीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आपल्या एक्स वर पोस्ट करत म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. त्यांनी टीका करताना भाजपावरही निशाणा साधलाय ते पुढे म्हणाले धस हे भाजपा परंपरेस जागले. वापरा आणि फेका. वापरा आणि सौदा करा अशा शब्दात संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित करत बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली आहे? असा सवालही यावेळी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे हे आज सकाळीच बीड येथील मस्साजोग या गावी जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपींना फाशी देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देशमुख कुटुंबियांना लवकरच न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही यादरम्यान दिले होते. या भेटीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. तसेच, देशमुख कुटुंबियांनी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होऊन ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी अशी ही मागणी केली आहे.