Sanjay Raut : किती आदळउपट केली, अश्रु ढाळले तरी आता त्यांना कोणी विचारणार नाही त्यांना वाऱ्यावर सोडले ; खासदार संजय राऊत
Sanjay Raut React on Shinde sarkar MLA : नाराज आमदारांच्या हाती खुळखुळा दिला जाईल, संजय राऊत यांची शिंदे गटाच्या नाराज आमदारांवर टीका
नवी दिल्ली :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत Sanjay Raut यांनी बोचरी टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली नव्हती पाहिजे असे आमचे मत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. म्हणून जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. भुजबळ यांनी आता कितीही आदळआपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागे एक आदर्श शक्ती होती. जी अदृश्य शक्ती एकनाथ शिंदे यांच्या मागे होती तीच शक्ती भुजबळ यांच्या मागे होती. त्यामुळे त्यांचा बळी गेल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ आमदारांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे अनेक आमदार हे नाराज असल्याचे सध्या माध्यमात दिसून येत आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की एक दोन नाराज आमदारांमुळे सरकारवर काही परिणाम होईल असं काही दिसत नाही. त्यामुळे जे आमदार नाराज आहेत ते दोन-तीन दिवस लढतील नंतर त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल आणि मग सर्व आमदार शांत होईल असा खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे नग आणि नमुने घेतले आहे त्यांनी त्या संदर्भात अभ्यास करायला हवा होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध देवेंद्र फडवणीस यांनी काय भूमिका घेतली होती याचा अभ्यास त्यांनी करायला हवा होता किती प्रकरणाचा भ्रष्टाचाराचे आरोप आपण त्यांच्यावर केले होते असा प्रश्नही संजयराव त्यांनी विचारला आहे.
बीड आणि परभणी सारख्या राज्यातील अनेक भागांमध्ये दंगली उसळले आहे तेथे तणाव निर्माण झाला आहे त्याकडे लक्ष देण्याची मागणी राहू त्यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी संजय राऊत यांनी केले असल्याचे म्हटले आहे.