Sanjay Raut Target PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्र बाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला
मुंबई :-शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधानांच्या मंगळसूत्रवरील विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत.काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही असे विधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत केले होते. Maharashtra Lok Sabha Election Update
मोदींच्याच काळात मंगळसूत्रे लुटली जातायेत संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत. काँग्रेसच्या काळात नव्हे तर उलट मोदींच्याच काळात महिलांची मंगळसूत्रे गहाण ठेवली जात आहेत, लुटली जात आहेत. जो माणूस स्वतःच्या घरातील मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्राची उठाठेव करू नये”, अशी जहरी जहरी टीका राऊतांनी केली. Maharashtra Lok Sabha Election Update
नोटबंदीमुळे महिलांनी मंगळसूत्रे गहाण ठेवली तसेच पुढे ते म्हणाले, “मोदींनी आणलेल्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना मंगळसूत्रे गहाण ठेऊन घर चालवावे लागले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला तेव्हा लाखो महिलांना मंगळसूत्रे विकून घर चालवावे लागले. शिवाय मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली त्याला जबाबदार मोदी आहेत. काश्मीरमध्ये भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांमुळे अनेक महिलांच्या मंगळसूत्राचे बलिदान झाले”, घणाघात राऊतांनी केली. Maharashtra Lok Sabha Election Update
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…