Sanjay Raut on Narayan Rane : आता कोर्टात चालणार मानहानीचा खटला; पुढील सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी
मुंबई :- शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे Naryan Rane यांनी आज माझगाव न्यायालयात हजेरी लावली. राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करत, आपण निर्दोष असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. मात्र, आता त्यांच्याविरोधात हा फौजदारी मानहानीचा खटला चालणार असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 15 जानेवारी 2023 रोजी भांडुप येथील एका कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी बोलताना म्हटले होते की, ‘मतदार यादीत संजय राऊत यांचे नाव नव्हते आणि मी शिवसेनेत असताना त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी मदत केली होती.’ राऊत यांनी राणेंच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राणेंनी जाणूनबुजून आणि खोटी टिप्पणी करून आपली बदनामी केल्याचा आरोप करत, राऊत यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला.
माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने एप्रिलमध्येच राणे यांना समन्स बजावले होते. न्यायालयाने म्हटले होते की, राणेंनी सार्वजनिक कार्यक्रमात बदनामीकारक विधाने केली असून, ती माध्यमांनीही प्रसिद्ध केली आहेत, ज्यामुळे राऊतांची प्रतिष्ठा मलिन झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होते.
विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला
या समन्सला राणे यांनी विशेष न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर राणे आज आपल्या वकिलांसोबत माझगाव न्यायालयात हजर झाले. त्यांना आरोप वाचून दाखवले असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली असून, 11 नोव्हेंबर रोजी साक्षीदारांची तपासणी होणार आहे. त्यामुळे आता राणे आणि राऊत यांच्यातील हा वाद राजकीय व्यासपीठावरून थेट न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…