मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल

Sanjay Raut Health Update : सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर; रूटीन चेकअप आणि आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर घरी परतणार

मुंबई :- शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारांसाठी भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार आणि आवश्यक तपासण्या होणार आहेत.

रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात

समोर आलेल्या माहितीनुसार, खराब प्रकृतीमुळे संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रक काढून प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवासस्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार आहेत.

राऊत यांनी दिली होती माहिती

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे माध्यमांपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याने चर्चा सुरू होती. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली होती. या पत्रकात राऊत यांनी म्हटले होते की:

“सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.”

संजय राऊत लवकर बरे होऊन जनसेवेत पुन्हा सक्रिय व्हावेत, यासाठी कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0