Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका
Sanjay Raut Target CM Eknath Shinde : बहिणी वरची माया विधानसभेच्या निवडणुकीनंतर कमी होणार, महाराष्ट्राच्या महिलांची फसवणूक ; खासदार संजय राऊत
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना काही मिळणार नाही त्यांची फसवणूक होत असल्याचा मोठा दावा संजय राऊत त्यांनी केला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्यावर झालेला हल्लावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीला दोन महिन्याचा कालावधी उरला आहे केवळ दोन महिन्यांसाठी बहिणीची उमाळा राहील. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही या लाडक्या बहिणीची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आला आहे तो केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरताच आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी भाई योजनेवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
भाजपशासित राज्यात लोकशाही उरली नाही जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कार हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले आहे.
संसदेसह, राम मंदिरालाही गळती पुढे राऊतांनी संसदेत झालेल्या गळतीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “जुनी इमारत सुस्थिती होती. ती अजून अनेक वर्षे चालली असती. त्यात कामकाज होऊ शकले असते. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्या आहेत. ही इमारत बांधून एक वर्ष होत आहे. तर राम मंदिर बांधून एक वर्ष झाले आहे. पण एकाच पावसात नवीन संसद इमारतीला गळती लागली. आमच्या कार संसद आवारात आल्या त्यावेळी पाणी होते. राम मंदिरात पाणी गळत आहेसरकार आहे कुठे? असा प्रश्न राऊतांनी केला आहे