Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा ; 400 पारचा नारा 200 पर्यंतच थांबेल
•देशातील लोकशाही टिकवायची असेल तर, मतभेद विसरून एकत्र यावे संजय राऊत यांचा आवाहन
नाशिक :- देशात लोकशाही आहे. लोकशाहीत एकमेकांवर टीका होत असते. मात्र, जेव्हा देश संकटात असतो, लोकशाही संकटात असते, त्यावेळी मतभेद विसरून एकत्र यावे लागते असे म्हणत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मविआतील पक्षांना आवाहन केले आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.400 पारचा नारा, 200 पारपर्यंतच थांबेल तसेच यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. “भाजपमध्ये सुमारे 250 खासदार असे आहेत, जे पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांनी नुकतेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले. अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यामागे निवडून न येण्याची भीती आहे. 400 पारचा नारा 200 पारपर्यंत थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकेका जागेसाठी भाजप रोज रात्रीचे 12 तास वाया घालवत आहेत” असे राऊत म्हणाले. Sanjay Raut
नाशिकमध्ये होणार राहुल गांधींचे स्वागत
पुढे “काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे शिवसेनेकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वीर सावकरांची ही ऐतिहासिक भूमी आहे. शालीमार चौकात हजारो शिवसैनिक उपस्थित राहून राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. तसेच त्यांच्या यात्रेतही आम्ही सहभागी होणार आहेत. नाशिकमध्ये आम्ही यजमान आहोत. त्यांचे सन्मानाने आणि यथोचित स्वागत करण्यात येणार आहे”, असे राऊतांनी सांगितले. Sanjay Raut
मनसेकडून इशारा संजय राऊत यांचे उत्तर
आता राहुल गांधी सावरकरांवर बोलत नाहीत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावे, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर त्यांना महाराष्ट्रातील जनता राज्यात फिरू देणार नाही, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सावरकर हा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेससाठी देखील हा विषय महत्त्वाचा आहे. मात्र, पूर्वी राहुल गांधी यांनी मत व्यक्त केल्यानंतर आतापर्यंत त्यावर एकदाही मत व्यक्त केलेले नाही” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अवमान
गडकरींचा अवमान आम्हाला सहन झाला नाही याशिवाय “नितीन गडकरी यांच्यासारख्या दिल्लीतील मराठी माणसाचा अवमान होऊ नये, अशी आमची भावना आहे. त्यांचा अवमान आम्हाला सहन झाला नाही. मराठी माणसाला अवमान सहन करण्याची सवय नाही. त्यामुळे गडकरी यांच्याबाबत आम्ही वक्तव्य केले होते. यात बालीशपणा काय आहे. तुम्ही वारंवार अपमान सहन करत आहात, याचे आम्हाला दुःख आहे”, असेही संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut