मुंबई

Maharashtra Vidhan Bhavan Session : ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना केल्याने भाजप आक्रमक!

Pravin Darekar On Anil Parab : भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनिल परब यांच्या विरोधात ठिय्या

मुंबई :- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे. आरोप प्रत्यारोप मालिकेत ठाकरे विरुद्ध भाजपाचा सामना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या भाजपाच्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब Anil Parab यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच, अनिल पराभव यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी भूमिका भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदारांनी घेतली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषनावर भाष्य करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायाचे उदाहरण देत आपल्यावरही पक्ष बदलण्यासाठी अशाच प्रकारे अन्याय झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपली तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल परब यांनी आपल्या भाषणात म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांना छळ झाला आणि मला पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात अनिल परब यांच्या विरोधात पोस्टर घेत अनिल परब यांनी जाहीर माफी मागावी अशी भूमिका दाखवली आहे.

विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी आपण केलेले वक्तव्य हे कोणत्याही अपमानाचे किंवा कोणाशीही तुलना करायचे नसल्याचे म्हटले असून मी कोणत्याही चुकीचे विधान केले नाही असे बोलत मी कोणतीही माफी मागणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये जरा गदारोळ झाला परंतु कामकाज पुन्हा सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0