Sanjay Raut Criticizes Shrikant Shinde And Deepak Kesarkar Over Shivaji Maharaj Statue : देवेंद्र फडणवीस हे खरे शिवभक्त असतील तर ते दीपक केसरकर यांना मंत्रालयाच्या समोर जोडे मारतील ; अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणीतील Shivaji Maharaj Statue पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमी तसेच विरोधकातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार विरोधात टिकेची जोड घेतली आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांच्यावर चांगलाच दिशा साधला आहे. तसेच या कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.देशांमध्ये इतके पुतळे उभे आहेत, समुद्रात, पाण्यात पुतळे उभे आहेत. मात्र ते कोसळले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे खरे शिवभक्त असतील तर ते दीपक केसरकर यांना मंत्रालयाच्या समोर जोडे मारतील,अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.
मालवण मधील पुतळ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये ठाणे कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव यातून पुढे येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मिंदे सरकार भ्रष्टाचार करते आणि आता याच पैशातून तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक लढणार आहात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मनाला झालेली सगळ्यात मोठी जखम असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हे बरे झाले. यातून काहीतरी चांगले घडेल असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. यावर देखील संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. बरे झाले ही घाण आमच्याकडून गेली, अशा विचारांची माणसे आमच्यात नाहीत हे बरे झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मिंद्यांनी पोसलेली ही औरंगजेबाची अवलाद असल्याची टीका देखील राऊत यांनी आहे. मात्र, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे पाप असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मिंदे आणि त्यांच्या टोळीला पोसण्याचे काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
खरा शिवभक्त असेल तर खासदार नारायण राणे यांनी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरायला हवे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात देखील भ्रष्ट्राचार केला आहे. त्याचा राणे यांनी निषेध करायला हवा, ज्यांनी पैसे खाल्ले आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील राणे यांनी केली पाहिजे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कंत्राटदार आणि शिल्पकार हे सापडत नाहीत. ते दोघे पळून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ते कोठे आहेत? असा प्रश्न विचारायला हवा. असे म्हणत राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…