Sanjay Raut : आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठका आचारसंहिता भंगाचा खासदार संजय राऊत यांचा आरोप
•खासदार संजय राऊत यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
मुंबई :- मोदींना ठाकरेंची आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची भिती तसेच आचारसंहिता जाहीर झाल्यावर कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नसते. पंतप्रधान मोदींकडे थोडे तरी शहाणपण असेल. मोदींना ठाकरेंची आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची भिती वाटते. मोदींनी सातत्याने महाराष्ट्रात येऊन भाषणे करावी. ते जिथे जातील तिथे भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही”, असे राऊत म्हणाले.तसेच “यंदा नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, धर्म विरुद्ध अधर्म, दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा अशी लढाई असणार आहे. आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणुकीसंदर्भात बैठका होत आहेत. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यांना संविधान कळत नाही”, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
अर्धा शहाणा कोण उद्या सांगेल दरम्यान, साडेतीन शहाण्यांपैकी हा अर्धा शहाणा कोण असे विचारले असता, संजय राऊत हसले आणि म्हणाले, आज गुढी पाडवा आहे, तर त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशासाठी उडवायची? त्याचे नाव तुम्हाला उद्याच सांगेन”. त्यांच्या या विधानाने देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्यावर संजय राऊतांची टीका संजय राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. “मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत असे राज ठाकरे म्हणायचे. आता त्याच महाराष्ट्राच्या दुश्मनांना कोण पाय ठेऊ देते ते आम्हाला बघायचे आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
35 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार तसेच “महाविकास आघाडी 35 हून अधिक जागा जिंकेल. काही जण राज्यातील 48 पैकी 48, कधी 45 हून अधिक जागा जिंकण्याच्या वल्गना करत आहेत. मात्र आम्ही अशा कोणत्याही वल्गना करणार नाही. 35 पेक्षा जास्त जागा जिंकू, कदाचित त्या 40 सुद्धा असतील”, असेही राऊत म्हणाले.