Sanjay Raut Latest News : उद्धव ठाकरे लवकरच यावर भूमिका स्पष्ट करणार, संजय राऊत यांचं सूचक विधान
मुंबई :- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील युतीच्या चर्चांना जोर चढला आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी या विषयावर सूचक वक्तव्य करून राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यावर अंतिम निर्णय जाहीर होणार
राऊत म्हणाले, “या युतीविषयी उद्धव ठाकरे लवकरच सविस्तर व ठाम भूमिका मांडतील. त्यांच्या उत्तरांमुळे सर्व शंकांचं निरसन होईल.” महाविकास आघाडी अजूनही सक्रिय असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “कोणत्या भागात कुठल्या पक्षासोबत युती करायची हे ठरवताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आहोत. काही जण काँग्रेससोबत जाण्याची मागणी करत आहेत, काही राष्ट्रवादीसोबत, तर काहींना स्वतंत्र वाटचाल हवी आहे.”
मनसेबरोबर युतीबाबत विचारले असता राऊत यांनी थेट उत्तर न देता, “उद्धवजी लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं देतील,” असे सांगितले. सध्या प्रभाग रचना प्रक्रियेवर भर असून ती पूर्ण झाल्यानंतर पक्षाची स्पष्ट भूमिका समोर येणार असल्याचं संकेत त्यांनी दिले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…