देश-विदेश

Sanjay Raut : विधानसभेला 180 ते 185 जागा महाविकास आघाडीला मिळेल संजय राऊत यांची भविष्यवाणी…

Sanjay Raut criticism Narendra Modi For PM Nomination : पराभूत झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा? खासदार संजय राऊत

नवी दिल्ली :- देशात लोकसभेच्या Lok Sabha Election Result निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये India Aghadi मोठा आत्मविश्वास स निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांची भारत न्याय जोडे यात्रा आणि भारत जोडो यात्रा यामुळे देशात परिवर्तन होणार असे सातत्याने इंडिया आघाडी कडून सांगितले जात होते परंतु यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलेच यश मिळाले असून भाजपाला एक हाती सत्ता मिळाली नाही तसेच भाजपाला आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएस च्या घटक पक्षाची साथ घ्यावी लागेल महाराष्ट्रात बहविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड केला आहे‌. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता विधानसभेवर लक्ष असून विधानसभेबाबतही अशीच रडणे ते आखून राज्यात महाविकास आघाडीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार अशी भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच पराभूत झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की,विधानसभेला 180 ते 185 जागा जिंकू मविआला विधानसभा मतदारसंघानुसार 125 जागांवर आघाडी मिळालीय त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “विधानसभेला याहून मोठ यश मिळेल. यावेळी अनेक ठिकाणी सत्तेच्या बळावर जागा पाडण्याचा प्रयत्न झाला. विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. विधानसभेला असं होणार नाही. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा जिंकू”, असे राऊत म्हणाले. Sanjay Raut criticism Narendra Modi For PM Nomination

राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. “माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. कारण 2014 आणि 2019 या दोन निवडणुकीत रुबाबात 56 इंचाची नसलेली छाती घेऊन मोदी पुढे जात होते, ते चित्र आता दिसत नाही. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँग्वेज बघा, मोदींची भाषा पाहा. त्यांना पक्षामध्ये विरोध असल्याची माझी माहिती आहे. त्यांना संघाचाही विरोध आहे. खरंतर नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

महाराष्ट्रात सुडाचे आणि बदल्याचे राजकारण कधीच नव्हते, ते फडणवीस यांनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच मि. फडणवीस, जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली असेही राऊत म्हणाले.फडणवीस राजकारणातील पुरुष आनंदीबाई संजय राऊत म्हणाले, “पेशवेकाळात आनंदीबाई होत्या, त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते, तसे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत. ही कटुता आमच्या मनात आहे, त्याला कारण फडणवीस स्वतः आहेत. हे सुडाचे, बदल्याचे फडतूस राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हे लोकांनी फडणवीस यांना दाखवून दिले. या महाराष्ट्रामधली एक पिढी संपवण्याचे काम फडणवीस यांनी केले. हातातील सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी केला, राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी सत्ता वापरली. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तीना घरी बोलावून धमकी दिली, हे काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केले”, असा आरोपही राऊत यांनी केला. Sanjay Raut criticism Narendra Modi For PM Nomination

Web Title : Sanjay Raut: Mahavikas Aghadi will get 180 to 185 seats in the Vidhan Sabha, predicts Sanjay Raut…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0