Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीचे 175-180 जागा मिळणार
•महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा, शरद पवार यांचे वक्तव्य
नवी दिल्ली :- महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून फार राजकीय रंग चढला आहे. शरद पवारांनी यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहे असे वक्तव्य केले होते. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्याचा चेहरा घोषित करावा अशी मागणी करत आहे. कारण लोक मुख्यमंत्र्यांना पाहून मतदान करायला असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे.संजय राऊत म्हणाले की, कोणतेही सरकार, कोणतीही संस्था ही बिन चेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे. हे लोकांना कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधींना मतदान केले, लोकांनी मोदींना मतदान केले, लोकांनी राजीव गांधींना मतदान केले. ठीक आहे पक्ष असतो, संघटना असतात, आघाडी असते. आम्ही एकत्र बसू या विषयावर चर्चा करु, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागला हे आपण पाहिले आहे. आम्ही निवडणूक एकत्र लढवणार आहोत. महाविकास आघाडीला शंभर टक्के बहुमत मिळेले. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. या राज्यातील जनतेने त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेतृत्व झिडकारले आहे. फडणवीस स्वतःला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते पण तसे काही नाहीये, नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. फडणवीसांना त्यात स्थान नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, घराघरात लाडला भाऊ, लाडली बहीण या योजना ठिक आहेत. मात्र पुण्यात घराघरातील लाडले भाऊ ड्रग्सच्या आहारी गेलेत, नाशिकमध्ये देखील तरुण ड्रग्सच्या आहारी गेलेत त्याचे काय? राज्यात ड्रग्स येतंय कुठून? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरले आहे.