Sanjay Raut : “महाजन हे मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री” – संजय राऊत यांचा थेट आरोप

Sanjay Raut On Girish Mahajan : शिंदे, फडणवीस, भाजपवरही जोरदार निशाणा; “साधूसंतांचे सरकार” अशी उपरोधिक टीका

मुंबई | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घमासान पेटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी थेट राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांच्यावर गंभीर आणि धक्कादायक आरोप करत, त्यांना “फडणवीस मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री” असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सांगितलं की, महाजन यांच्या कार्यालयात “अभिषेक कौल” नावाचा ठेकेदार आणि बिल्डर सारे व्यवहार पाहतो. “त्याच्या फोनशिवाय एकही फाईल मंजूर होत नाही. पैसे त्याच्याकडे जमा करावे लागतात,” असा स्पष्ट आरोप राऊत यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितलं की, सध्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात तब्बल 350 फाईली रखडल्या असून त्या सर्व व्यवहारांशी अभिषेक कौलचा संबंध आहे. त्यामुळे सामान्य जनतेशी निगडित खात्यातील ही स्थिती गंभीर आहे, असं राऊत म्हणाले. फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी टोला लगावला, “देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भोवती साधूसंतांचा मेळा जमवला आहे. त्यातील एक म्हणजे गिरीश महाजन!”

एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख करत राऊत म्हणाले, “मी म्हणजेच पक्ष असं म्हणणाऱ्यांचं अधःपतन अटळ असतं.” तसेच भाजप आणि शिंदे गटावर पक्षफोडीचा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला.

राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, “अभिषेक कौल कोण?” या प्रश्नाने आता राजकारण तापलं आहे. महाजन यांचा अजून प्रत्युत्तर आलेलं नाही, मात्र आगामी काळात या आरोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago