मुंबई

Sanjay Raut : “कोकाटेंचा राजीनामा अटळ! प्रफुल्ल लोढा प्रकरणातील ‘मोठा मासा’ मंत्रिमंडळातच बसलेला” — संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

•”कृषिमंत्री रमी खेळतात, पण राजीनामा घेतला जात नाही — हे सरकारचं दुर्बलपण!”

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा लागेल, असा ठणकाव त्यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता, प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून मंत्रिमंडळातील ‘मोठ्या मासा’ची उपस्थितीही त्यांनी अधोरेखित केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. कोकाटेंवर टीका करताना त्यांनी टोला लगावला, “ज्यांना आपलं खातं ओसाड गाव समजतं, तेच रमी खेळत बसतात आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही — हे या सरकारचं दुबळेपण आहे!”

“राजीनामा द्यावा लागेल, आणि घ्यावाही लागेल”, अशी ठाम घोषणा करत राऊतांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची ‘मजबुरी’ कोणती, असा रोखठोक सवालही केला.

प्रफुल्ल लोढा प्रकरणावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “लोढा हा केवळ एक छोटा मासा आहे, पण मोठा मासा तर मंत्रिमंडळातच बसलेला आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी या प्रकरणाचा तपास फक्त केंद्रीय यंत्रणाच करू शकतील, अशी मागणी केली.

“लोढाचे कोणासोबत फोटो आहेत, हे गौण आहे. तो काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचे!” असे सांगत राऊतांनी प्रफुल्ल लोढाकडे मंत्रिमंडळातील ‘मोठ्या मासा’विरोधात पुरावे असल्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी हनीट्रॅप प्रकरणात चार मंत्री अडकल्याचा आरोप केला होता, त्यालाही पुन्हा उजाळा दिला.

याशिवाय, राऊतांनी शिंदे गटावरही घणाघात केला. “एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 8 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, महायुतीचा हा ढोल फार दिवस वाजणार नाही,” असेही त्यांनी थेट सांगून टाकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0