Sanjay Raut : हिंदू धर्मात विश्वासघाताला, फसवणुकीला थारा नाही ; खासदार संजय राऊत

•शंकराचार्य समोर एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी वाकून नमस्कार केला.. संजय राऊत कडून आठवण
मुंबई :- शंकराचार्य यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शंकराचार्य म्हणाले की, झोप विश्वासघात करतो तो हिंदू नाही, आणि विश्वासघात करूनही सहन करतो तो खरा हिंदू असे म्हणत शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे हे जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत आमच्या वेदना कमी होणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर झालेल्या अन्यायावर त्यांनी भाष्य केले आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते आहे. त्यांच्या भावना हे जनतेच्या भावना आहे शंकराचार्यांना खोटं ठरवतील यात शंका नाही आणि त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही. शंकराचार्य यांच्यासमोर एकदा कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनीही वाकून नमस्कार केला आहे अशी आठवण करून देत संजय राऊत यांनी भाजपा साहेब शिंदेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत खटला सुरू आहे. तो चालेल तेवढा चालेल. पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशिर्वाद दिले.आमच्यावरील अन्यायाबाबत खंत व्यक्त केली, ही मोठी गोष्ट आहे. शंकराचार्य हे हिंदू धर्मात सर्वोच्च आहेत, त्यांचे म्हणणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी राजकीय भाष्य केले नाही, तर केवळ आपले मन मोकळे केले. न्यायालयात घटनाबाह्य सरकार विरोधात खटला सुरु आहे. आदरणीय शंकराचार्यांनी जो आशिर्वाद दिला, अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली, ती आमच्यासाठी मोठी आहे. शंकराचार्यांनी त्यांचे मन मोकळे केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली सेना त्याचे उद्धव ठाकरे नेतृत्व करतायत. त्याच शिवसेनेचा विश्वासघाताने तुकडा पाडला. हा हिंदुंचा विश्वासघात आहे, असे मत शंकराचार्यानी व्यक्त केल्याचे राऊतांनी म्हटले आहे.