मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्र्यांना हिंदीचे इतकेच प्रेम असेल तर त्यांनी युपी, एमपीत जाऊन निवडणूक लढवावी’; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On BJP : नवी मुंबईत हिंदीची सक्ती आणि वसईतील भाषणावरून राऊतांचा फडणवीसांवर प्रहार; ‘अण्णामलाईं’चाही केला तीव्र भाषेत निषेध

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC Election प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘भाषिक अस्मिते’वरून जोरदार निशाणा साधला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री किती खोटे बोलू शकतात याचे उदाहरण म्हणजे त्यांचे हिंदी प्रेम आहे. जर त्यांना मराठी भाषेबद्दल आस्था नसेल, तर त्यांनी उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी,” अशा शब्दांत राऊतांनी Sanjay Raut आपली तोफ डागली.

संजय राऊत यांनी भाजपच्या नवी मुंबईतील जाहीरनाम्यावर बोट ठेवत गंभीर आरोप केले. नवी मुंबई हे शहर आगरी, कोळी आणि कष्टकरी मराठी माणसांनी वसलेले असताना भाजप तिथे ‘हिंदी सक्तीची’ करण्याचे आश्वासन कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “नवी मुंबईची भाषा मराठी नाही का? तिथे गणेश नाईक, मंदा म्हात्रे किंवा प्रशांत ठाकूर हे स्थानिक नेते असतानाही भाजप तिथे हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. हे शहर मराठी माणसाचे आहे, बाहेरून आलेले लोक तिथे केवळ कामासाठी आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या वसई-विरारमधील प्रचाराचा उल्लेख करताना राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वसई-विरारमध्ये प्रचाराला गेले होते. तिथे त्यांचे भाषण ऐकून मला धक्का बसला, कारण ते संपूर्ण भाषण हिंदीत होते. वसई-विरार हा चिमाजी आप्पांचा भाग आहे, किमान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा होता. तिथली मुख्य भाषा मराठी असताना मुख्यमंत्री तिथे हिंदीत भाषण करून काय सिद्ध करत आहेत? प्रत्येक ठिकाणी हिंदी लादून मुंबई महाराष्ट्राबाहेर काढण्याचे हे मोठे कारस्थान आहे,” असा दावाही त्यांनी केला.

यावेळी राऊतांनी भाजपचे नेते अण्णामलाई यांच्या विधानाचाही समाचार घेतला. अण्णामलाई यांनी मुंबईच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर संताप व्यक्त करताना राऊत म्हणाले की, “जर तुम्हाला मुंबई टोचत असेल, तर सरळ चेन्नईला निघून जा. महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळण्याचे धाडस करू नका.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा नेत्यांची ‘रीढ’ ओढत असल्याचा आरोप करत राऊत यांनी आगामी निवडणुकीत मराठी माणूस या भाषिक अपमानाचा बदला घेईल, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0