Sanjay Raut Interview : राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून तब्बल पंचवीस वर्षे झाले; संजय राऊत
मुंबई :- संजय राऊत Sanjay Raut यांनी नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यासह महाराष्ट्र व देशाच्या राजकारणाशी संबंधित विविध मुद्यांवर थेट भाष्य केले आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची वेळ निघून गेली आहे. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून तब्बल 25 वर्षे झाली आहेत. बाळासाहेब असताना सर्वांना जे काही झाले ते योग्य झाले नाही असे वाटायचे. पण पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे Raj Thackeray व त्यांच्या सहकाऱ्यांनी काय मिळवले? याऊलट शिवसेनेचे तुकडे होऊनही ती आहे तिथेच उभी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी जनतेने यापूर्वी अनेकदा या दोघांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली. पण या दोघांनीही अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दोघांनी एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. शिवसेना सोडून राज ठाकरे यांना कोणता फायदा झाला? काहीच नाही. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे. राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही मराठी माणसांच्या मनातील भावना आहे. पण महाराष्ट्राच्या कुंडलीत जे की आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणालेत.
राज ठाकरेंनी त्यांचा मार्ग त्यांनीच निवडला. राज ठाकरेंना Raj Thackeray कुणीही जा सांगितलं नाही. एखाद्या घरात चार मुलं असतील तर ती त्यांच्या मार्गाने जातात. कुणी आई वडिलांना सोडून अमेरिकेला जातो. कुणी आणखी काही भूमिका घेतात. समाजात या गोष्टी घडतात. राज ठाकरे हे माझे अजूनही मित्र आहेत. महाराष्ट्र, मराठी यांच्यात फूट असता कामा नये हे तर माझ्यासारख्या माणसाला वाटणारच. एखादा मार्ग एखाद्या सज्ञान व्यक्तीने निवडला आहे. याचा अर्थ त्याला आपलं भवितव्य कळतं. वेगळे जरी झालो तरीही कटुता असता कामा नये असं आम्ही मानतो आणि ती कटुता आमच्यात नाही. राजकीय मार्ग वेगळे असू शकतात. एकाच घरात चार पक्षाचे लोक आम्ही पाहिले आहेत, आपणही पाहतो.” इसापनिती या YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना सोडली तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना मराठी माणसाच्या मनात आहे. अशात खासदार संजय राऊत यांचे राज ठाकरेंशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांना जेव्हा विचारण्यात आलं की सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.