•छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुट बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा निशाणा
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपचाच आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढावला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुट बद्दल जे विधान केले आहे त्यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणातले आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाही ना?असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालवण येथील शिवरायांच्या पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही ताब्यात नसल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. इतकेच नाही तर मुंबई विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी अदानी समूहावर देखील पुन्हा निशाणा साधला. मालवणमधील एक प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना मुंबईतील हे दुसरे प्रकरण समोर आल्याने सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वतःचे कर्तृत्व नसताना केवळ मोदी आणि शहा यांच्या ताकतीचा वापर करून स्वतःच्या काकाचा पक्ष आणि चिन्ह पळवले. त्यांनी मर्दानगीची भाष करु नये, असे आव्हान संजय राऊत यांनी अजित पवार यांना दिले आहे. हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, निवडणूक चिन्ह तयार करा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणात आहेत, त्यांच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल
भाजपचा एक आमदार त्यांचे वडील आधी शिवसेनेमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. हे लोक आता हिंदुत्ववादी झाले आहेत. मशिदीमध्ये घुसून हल्ला करण्याची भाषा हे आमदार करत आहेत. नरेंद्र मोदी यांना माझे आवाहन आहे की, या प्रकारची भाषा त्यांना मंजूर आहे का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी नाव न घेता आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. ही विचारसरणी किंवा अशी भाषा नरेंद्र मोदी यांना मान्य असेल तर त्यांनी विदेशात जाऊन मशिदीत जाणे सोडून द्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी यांनी केले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…