Chitra Wagh : राऊतांना टॅग करून विषय खत्म ट्विट: चित्रा वाघ यांची खोचक टीका
Chitra Wagh Tweet On Sanjay Raut ; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या गुजरातीत नावाचा उल्लेख
मुंबई :- राज्यात निवडणुकांची रनधुमाळी मध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका चालू असताना आता ट्विटर वार ही चालू आहे. संजय राऊत यांनी एक ट्विट करत राजकीय चर्चांना उधाण आणून दिला आहे. संजय राऊत Sanjay Raut यांच्या ट्विट नंतर आरोप प्रत्यारोपाची मालिका पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी काल आपल्या “एक्स”वर ट्विट करत ही निवडणूक शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे ट्विट करत या तीनही लोकांचे नावे संजय राऊत यांनी गुजराती मध्ये टाकल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामध्येच भाजपच्या नेत्या विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ Chitra Wagh यांनी संजय राऊत यांचा जनाब संजय राऊत असं करत त्यांचे नाव उर्दूमध्ये टाकले आहे. त्यामुळे आता राजकीय मैदानातून ट्विटर वार चालू झाला आहे.
खासदार संजय राऊत यांचे ट्विट!
ही निवडणुक… शरद पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी विरूद्ध દેવેન્દ્ર ફડણવીસ, એકનાથ શિંદે, અજિત પવાર अशी आहे.विषय कट ! असे ट्विट करून आणि प्रचाराच्या दरम्यान संजय राऊत यांनी विरोधकांसाठी टिकेची आयाती संधी दिली आहे.
भाजपा नेत्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांचे ट्विट
जनाब संजय राऊत…
छे ….ही निवडणूक
श्री एकनाथ शिंदे श्री देवेंद्र फडणवीस,
श्री अजित पवार
विरुद्ध
شرد پوار، راہول گاندھی، ادھو ٹھاکرے۔
अशी आहे..
विषय खत्म !