मुंबई

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून डर्टी पॉलिटिक्स वाढले ; खासदार संजय राऊत

Sanjay Raut Target Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी किमान 1000 कोटी रुपये द्यावे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे देवेंद्र फडवणीस यांचा उदय झाल्यापासून राज्याच्या राजकारणात दर्टी पॉलिटिक्स चे प्रमाण वाढले आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच महाराष्ट्रात पूर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्र सरकारला एक हजार कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे करावे असेही संजय‌ राऊत म्हणाले आहे.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “या महाराष्ट्रात राजकारणाचं अधःपतन कुणी केलं असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. लोकांचे फोन टॅप करा, क्लिप्स बनवा. अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, क्लिप्स तयार केल्या. मला तर वाटतं की मोदी ज्याप्रमाणे नॉन बायलॉजिकल पंतप्रधान आहेत तसंच महाराष्ट्राला नॉन बायलॉजिकल गृहमंत्री मिळाला आहे. या भूमीवरचा माणूस नाही वरुनच पडला आहे हा माणूस. या राज्याच्या राजकाणाची प्रतिष्ठा ठेवणार की नाही? या महाराष्ट्रात अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स हे गेल्या पाच ते दहा वर्षांत वाढलं आहे. देशात मोदी आणि शाह आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून हे वाढलं आहे. डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं राजकारण हे सुरू झाले आहे”, असे राऊत म्हणाले. Maharashtra Politics Latest Update

संजय राऊत म्हणाले, “भाजपाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली. भाजपाचा क्लिप्सचा कारखाना आहे. क्लिप्स बनवा, लोकांचे फोन टॅप करा. विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. विरोधकांचे फोन टॅप करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यांना जर देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर क्लिप्सचं काय घेऊन बसलात? आमच्या सगळ्यांचे फोन ज्यांनी चोरुन ऐकले किंवा ऐकायला दिले. त्यांचं निलंबन होणार होतं, पण त्याच महिला अधिकारी सरकार बदलल्यावर पोलीस महासंचलाक झाल्या. असं होणार असेल तर फडणवीसांकडून काय अपेक्षा ठेवणार?” असा सवाल यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, “मुंबई, कोकणासह अनेक ठिकाणी पूरस्थिती धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. नुकतेच जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात पूर्वपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी रुपये देण्यात आले. मग केंद्रातील सरकारला महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का? महाराष्ट्रासाठी किमान 1 हजार कोटी तरी द्या असे राज्यातील मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगितले पाहिजे. मात्र हे सत्ताधाऱ्यांमध्ये हे सांगण्याची हिंमत नाही”, अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Politics Latest Update

संजय राऊत म्हणाले, पाच महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांनी स्वतः हा गौप्यस्फोट केला आहे. केवळ अनिल‌ देशमुखच नव्हे तर अटक टाळण्यासाठी आम्ही सांगतो ते एका असे अनेकांना भाजपकडून सांगण्यात आले आहे. मलाही असे सांगण्यात आले आहे. अशोक चव्हाण, प्रफुल पटेल,हसन मुश्रीफ तसेच शिंदेंसोबतचे आमदार भाजपमध्ये का गेले? हा प्रश्न आहे. अनिल देशमुख यांनी उघडपणे विधान‌ केले. मात्र ईडी, सीबीआयपासून वाचण्यासाठीच अनेक आमदार खासदार भाजपसोबत आहेत”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.देशमुखांनी मलाही सत्य सांगितले होते. उद्धव, आदित्य ठाकरे, शरद पवारांना तुरुंगात डांबण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. तोच आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केला. यावरूनच राऊतांनी भाष्य केले आहे. Maharashtra Politics Latest Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0