Sanjay Raut On Sunil Shelke : “आता सत्ता तुमच्याकडे आहे, पण उद्या कोणत्या बाजूला वारा असेल, सांगता येत नाही” — राऊतांचा इशारा
मुंबई | “मावळची जनता 100 कोटींना विकत घेऊन तू आमदार झालास!” असा रोखठोक आणि तीव्र हल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केला आहे. Sanjay Raut On Sunil Shelke पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही लक्ष्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यावर ‘चोरून म्हटलं की सोडून?’ असा सवाल उभा केला.
राऊत म्हणाले, “शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलेला माणूस सत्ता पाहून दुसऱ्याच गटात गेला. आता आम्हालाच सल्ले देतो. इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेला, पर्यटक मृत्युमुखी पडले, तेव्हा आमदार कुठे होते?” असा जाहीर प्रश्न त्यांनी विचारला. “आज सत्ता आहे, उद्या राहीलच याची खात्री नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा सध्या राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप राऊतांनी केला. मुलाचा उल्लेख होताच घोसाळकर भावूक झाले. भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी आपली निष्ठा शिवसेनेच्या ठाकरे गटाशी असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमधील परिस्थितीवर भाष्य करताना राऊतांनी सांगितले की, “ज्यांना पक्षातून जावं वाटलं ते गेले. ज्यांनी पक्षाला अडचणीत टाकलं, त्यांना बाहेरचं दरवाजा दाखवण्यात आला.” बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, “ते आमच्यात होतेच कुठे?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…