Sanjay Raut On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवायची आहेत, कारण दंगलीशिवाय तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही.
मुंबई :- शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा “जय भवानी” आणि जय शिवाजीचा नारा देतात तेव्हा त्रास होतो, त्यांना जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही आणि त्यांना औरंगजेबाबद्दल बोलायचे असेल तर गुजरातमध्ये जा आणि करा… तुम्हाला इथे अधिकार नाही. महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी दंगली पाहिजेत, दंगलीशिवाय ते जिंकू शकत नाहीत. म्हणूनच हिंदू, मुस्लिम आणि भारत आणि पाकिस्तान सर्वकाही करतात. त्यांनी काहीही केले तरी येथे महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. हा क्लब नुकताच अस्तित्वात आला असून, फडणवीस व त्यांचे सहकारी या क्लबचे अध्यक्ष व सदस्य आहेत. आम्ही महाराजांच्या सन्मानार्थ आंदोलन केले. हे आंदोलन दाबण्याचे काम त्यांनी केले. यावरून त्यांचा औरंगजेब फॅन क्लब सिद्ध होतो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी औरंगजेबाच्या बाता गुजरातमध्ये जावून कराव्यात. या महाराष्ट्रात आम्ही औरंगजेबाची कबर बांधली गेली आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळा आहे. त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध आहे हे समजून घ्यावे लागेल. ते इतिहास मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने शिवाजी महाराजांचा केलेल्या अवमानावर बोलावे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अवमान केला. आता दीपक केसरकर यांनी अवमान केला. या लोकांनी मालवण येथील पुतळ्यात झालेल्या भ्रष्टाचारावर बोलावे. ज्यांनी हा अपमान केला, त्यांची मानसिकता काय? याचे उत्तर द्यावे.
शेवटचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी शिवाजी महाराजांचे साम्राज्य लयास नेले. त्यांनी सर्वप्रथम पुण्यातील शनिवारवाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकावला. त्या पेशव्यांचे फडणवीस हे उत्तराधिकारी आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. हे दुर्दैवाने आम्हाला बोलावे लागत आहे. फडणवीस कोणता इतिहास सांगत आहेत? आम्ही शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी संघर्ष करत आहोत. त्यानंतरही तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता? तुम्ही मालवणमधील पुतळा तोडला. हे तुमचे पाप आहे. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरत आहेत. तुम्ही त्यांना अटक केली नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मालवणला गेल्यानंतर त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम भाजपचे गुंड करत होते. देवेंद्र फडणवीस हे त्यांचे समर्थक आहेत.
पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे त्यांचे गुंड आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिवकणार आहेत काय? तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. हा शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. हे तुमच्या मनात आहे की नाही? शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ही घोषणा कुणाची होती. शिवरायांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव व कारवार या सीमाप्रश्नावरील आपली भूमिका स्पष्ट करा. शिवाजी महाराजांचे राज्य हे मावळ्यांचे राज्य होते. हे तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात, असे संजय राऊत यावेळी फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहेत. महाराजांनी सूरत एकदा नव्हे तर दोनदा लुटली हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…