Sanjay Raut : नगरसेवक ‘पापी’ तर मुख्यमंत्री ‘महापापी’? राऊतांनी फडणवीसांना त्यांच्याच शब्दात पकडले!

Sanjay Raut On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना फक्त एक दिवसाची बातमी हवी; शरद पवार डाग लावून घेणार नाहीत – संजय राऊतांची टोलेबाजी

मुंबई | “जो नगरसेवक होतो तो पाप करतो आणि जो महापौर होतो तो महापाप करतो, असं विधान जर देवेंद्र फडणवीस यांनी केलं असेल, तर त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीकडे पाहावं. फडणवीस स्वतः नगरसेवक आणि महापौर राहिले आहेत. मग त्यांच्याच व्याख्येनुसार त्यांनी किती मोठं पाप आणि महापाप केलंय?” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली.

फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर निशाणा

सकाळच्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी फडणवीसांच्या एका विधानाचा संदर्भ दिला असता राऊत खणखणीत बॅटिंग केली. ते म्हणाले, “फडणवीस यांची राजकीय सुरुवात नागपूरचे नगरसेवक म्हणून झाली. जर नगरसेवक होणं पाप असेल, तर त्यांनी ते पाप केलंय. त्यानंतर ते महापौर झाले, म्हणजे त्यांनी महापाप केलं. पुढे ते आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले, मग याला काय म्हणायचं? त्यांनीच ही व्याख्या मांडली असेल तर ती त्यांनाच सर्वात आधी लागू होते.”

बिनविरोध निवडीवरून ‘इतिहास’

आठवून दिला राज्यात महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार दबावापोटी बिनविरोध निवडून येत असल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यांनी आठवण करून दिली की, “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई जेव्हा निवडणुकीला उभ्या होत्या, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. तो राजकीय सुसंस्कृतपणा होता. पण आज दबावाचे राजकारण सुरू आहे. अगदी मोदी, शहा किंवा इंदिरा गांधी यांनाही बिनविरोध निवडून येता आले नाही, हे विसरू नका.”

“शिंदेंना केवळ एक दिवसाची बातमी हवी”

शिवसेना आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. “एकनाथ शिंदे यांना फक्त ‘आज याला फोडलं, उद्या त्याला पक्षात घेतलं’ अशा एक दिवसाच्या बातम्या हव्या असतात. पण जे लोक तिथे जात आहेत, त्यांचं पुढे काय होतं, हे कोणी पाहतं का? केवळ प्रसिद्धीसाठी हा फोडाफोडीचा खेळ सुरू आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवार NDA सोबत जाणार?

राऊतांनी फेटाळले निवडणुकीनंतर शरद पवार भाजपप्रणीत एनडीए (NDA) सोबत जातील अशा चर्चांना राऊतांनी सणसणीत उत्तर दिले. “शरद पवार या वयात असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. त्यांच्यासारखा मोठा नेता आता स्वतःच्या कारकिर्दीवर असा कोणताही डाग लावून घेणार नाही. ते एनडीएसोबत जाण्याची शक्यता शून्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

vivek

Recent Posts