Sanjay Raut : मुख्यमंत्री, प्रशासन, पोलीस आयुक्त आता सर्व दिल्ली ठरवणार, महाराष्ट्रातील नेते त्यांच्यासमोर झुकले ; खासदार संजय राऊत
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारू नका ; संजय राऊत
नवी दिल्ली :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर राज्यात ठरवता येत नसेल आणि इतर कोणाच्या तरी सांगण्यावरून राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जात असेल किंवा सरकार स्थापन केले जात असेल तर स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री, प्रशासन, पोलीस आयुक्त कोणी काय करावे हे दिल्लीतील नेतृत्व ठरवत असेल आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्यासमोर माना झुकून उभे आहे असा टोला खासदार संजय राऊत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे. Sanjay Raut Criticized On Delhi Politics Mahayuti Govt Maharashtra Cm Post Politics
संजय राऊत म्हणाले की, महायुतीत 3 पक्ष एकत्र आहेत. त्यांत भाजपला 132 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 50 हून अधिक तर अजित पवारांच्या पक्षाला 40 हून अधिक उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटप कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरंक्षण मंत्रीपदही मागू शकतात. यांचे तुम्ही काही मनावर घेऊ नका. जर दिल्लीने डोळे वटारले तर हे शांत होतील. मग ते अजितदादा असो की एकनाथ शिंदे कारण ते शरणागत आहे. त्यांना काही मिळाले नाहीतरी ते युतीत तसेच पडून राहतील. मावळता सूर्य आणि उगवता सूर्य यात फरक असतो. उगवत्या सूर्याचे तेज असते, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
आम्हाला राज्याचे निकाल मान्य नसले तरी मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करु. निकालात गडबड घोटाळे आहे हे आम्ही सातत्याने दाखवून देत असलो तरी सत्तास्थापनेसाठी बहुमत लागत असते आणि ते कसेही आणले असले तरी आकडा महत्त्वाचा असतो, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना जे हवे आहे ते कधीच मिळणार नाही. भाजपचे यांच्याकडून महाराष्ट्र कमजोर करण्याचे काम करुण घेतले आहे. त्यांनी शिवसेना अन् राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडले, आता यांचे काम संपले आहे. यापुढे जर हे दोन्ही पक्ष फुटले अन् भाजपला जाऊन मिळू शकतात असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांना देशातील लोकशाहीचा बचावासाठी आंदोलन करावे लागते, यातच या निकालाचे रहस्य दडले आहे. समाज त्यांच्या मागे उभा राहील असे चित्र दिसत आहे. Sanjay Raut Criticized On Delhi Politics Mahayuti Govt Maharashtra Cm Post Politics