Sanjay Raut : गुजरात मधून येणाऱ्या कंटेनर चे तपासणी करा! खासदार संजय राऊत यांचे ट्विट
Sanjay Raut Tweet : खासदार संजय राऊत ट्विट, ट्विटमध्ये कंटेनर फोटो निवडणूक आयोगाला सांगितले हे
मुंबई :- राज्यात 20 तारखेला मतदान होणार आहे त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने Election Commissioned आतापर्यंत केलेला कारवाईक जवळपास शंभरहून अधिक कोटी रुपये आचारसंहिता भंग प्रकरणी जप्त केले आहे. या कारवाईत निवडणूक आयोगाने अमली पदार्थ दारू अवैध शस्त्रसाठा यांसारख्या कारवाया करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असताना आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शक काम करावे याकरिता विरोधकांकडून सातत्याने निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या वाहनांची तपासणी करण्याचा सल्ला देत असतात. अशातच खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केलेल्या ट्विट नंतर पुन्हा एकदा नवा वाद चर्चेला येऊ शकतो.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक्स कंटेनरचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे की, गुजरात मधून येणाऱ्या कंटेनरची ही तपासणी करा असा सल्ला संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. गुजरात मधून पैसा येणार असल्याची भीती संजयराव त्यांनी व्यक्त केली असल्याचे या ट्विट मधून दिसत आहे.महाराष्ट्रात आता पैसे वाटपासाठी अशा कंटेनर चा वापर सुरु झालाय.
गुजरात मधून येणाऱ्या कंटेनर ची तपासणी व्हावी!
निवडणूक आयोग उघडा डोळे बघा नीट!