मुंबई

Sanjay Raut : “भाजपचा बाप मुंबई तोडणार!” — संजय राऊतांचा फडणवीसांना जहाल प्रतिवाद

•“ना कोणाचा बाप, ना आजा-पंजा… हे राज्य नाट्यभूमी आहे; नाटकी भाषा थांबवा”

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कुणाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, आजा-पंजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही” असं ठणकावत उत्तर दिलं होतं. पण त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला.

“भाजपचा बाप मुंबई तोडणार आहे. आणि हे सगळं उद्योगपतींच्या दबावामुळेच सुरू आहे. मुंबईतील विजेचे कनेक्शन, गिरणी कामगार, घरांच्या किंमती — सगळं गुजरातकडं झुकवलं जातंय,” असा थेट आरोप राऊतांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून “गिरगाव चौपाटीवर मराठी माणसांशी शांतपणे संवाद साधावा आणि त्यांचा मुंबईवरचा हक्क समजावून सांगावा,” असं आव्हान दिलं.

फडणवीसांच्या ‘नाटकी भाषे’वर तुटून पडताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्र ही नाट्यपंढरी आहे. इथे नटसम्राट निर्माण होतात, पण मुख्यमंत्री नाटकी संवादात रमले आहेत. कोणाचा बाप कोणाचा पंजा म्हणणं म्हणजे रंगभूमीचा अपमानच आहे.”

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “आज गुन्हेगार विधान भवनाच्या दारात उभे राहून आमदारांना धमकावत आहेत. उद्या दाऊद, टायगर मेमनलाही भाजप प्रवेश देईल का?” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

तसेच, राज ठाकरे यांना समर्थन देत राऊत म्हणाले, “राज ठाकरे जे बोलले ते बरोबरच आहे. दुबेचा निषेध भाजपकडून झाला नाही हेच पुरेसं आहे. दोन ठाकरे आज एका मुद्द्यावर एकत्र आले आहेत, आणि आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0