Sanjay Raut : भाजपाला महाराष्ट्राचा मिर्झापुर करायचा आहे ; खासदार संजय राऊत
Sanjay Raut : तुरुंगातील आरोपींना भाजपकडून प्रवक्ते पदाची जबाबदारी, सचिन वाझे यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई :- सचिन वाझे Sachin Waze यांनी केलेल्या आरोपावर संजय राऊत Sanjay Raut यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे. संजय राऊत म्हणाले की भाजपाने तुरंगातील आरोपींना प्रवक्ते पदाची जबाबदारी दिल्याच्या आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपाला महाराष्ट्रात मिर्झापुर करायचे आता गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केलं आहे. तसेच पराभवाच्या भीतीने गुंडांच्या वापर करून राजकारण करणारे खरे सूत्र देवेंद्र फडवणीचे टीका संजय राव त्यांनी केली आहे.
वाझे हत्येतील आरोपी, मात्र आता भाजपचे प्रवक्ते पुढे राऊत म्हणाले, वाझे कोण आहेत? ते हत्येतील आरोपी आहेत. मात्र आता ते भाजपचे प्रवक्ते बनले आहेत. प्रसार माध्यमे त्यांना महत्त्व देत आहेत. देशातील जनता अशा प्रकारच्या राजकारणाचा तिरस्कार करते. भाजपकडून पराभवामुळे गुंडाची मदत घेतली जात आहे. गुंडांचा आश्रय घेत कधी जयंत पाटील, कधी संजय राऊत यांचे नाव घेतले जाते. मात्र तुरुंगातील आरोपीच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे?”, असे राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आता विधासभेत देखील ते हरणार आहेत. त्यांच्याकडे दुसरे आहेच तरी काय? भाजपने वेब सिरीज बनवली आहे. त्यांना महाराष्ट्राचा मिर्झापूर करायचा आहे. स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही. पुरावे समोर आल्याने त्यांची फाटली आहे. म्हणून तुरुंगातील प्रवक्त्यांना बाहेर काढले जाईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ले केले जातील. त्यासाठी गुंडाना तुरुंगात फोन केले जातात”, असे गंभीर आरोप राऊतांनी केले.
वाझेंनी आज जयंत पाटलांचे नाव घेतले. उद्या बावनकुळे, अमित शहांचे नाव घेतील. अमित शहा तर तुरुंगातच जाऊन आलेले आहेत. काही दिवसांनी वाझेंना वॉशिंग मशीनमध्ये टाकतील. राज्याचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचले आहे. अशा प्रकारच्या राजकारणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याकडून उत्तर देण्यासाठी तुरुंगतील प्रवक्ते, गुंड यांची मदत घेतली जात आहे. भाजपवर संकट आले की हे आरोपी बाहेर येऊन बोलतात. त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे”, असा हल्ला राऊतांनी चढवला आहे.