Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांना भीती, बिना चेहरा महाविकास आघाडीला जनता स्वीकारणार नाही
मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन Maharashtra Monsson Session चालू आहे. महाविकास आघाडी यंदाच्या अधिवेशनात राज्य सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेण्याचा प्रयत्न करत असताना संजय राऊत Sanjay Raut यांचे मोठे वक्तव्य समोर आली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या Maha Vikas Agahdi नेत्यांना सुचव दिला आहे की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उमेदवाराच्या चेहरा घोषित करावा, राज्यातील जनता महाविकास आघाडीला चेहऱ्याशिवाय स्वीकारणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहे.
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्याला शिवेसनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडाडून विरोध केला आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. कारण, जनता बिनचेहऱ्याची मविआ स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, नव्या संसदेची आज रितसर सुरुवात होत आहे. राष्ट्रपतींच भाषण आज होईल. अल्पमताचे सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे, किती थापा मारतंय ते पाहावे लागेल. यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्याचं प्रतिबिंब हे राज्यसभेत सुद्धा पहायला मिळेल. भाजपने बहुमत गमावलं आहे. कुबड्यांवरचे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट हे आपल्याला पहावे लागतेय असे राऊत म्हणाले. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…