Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : ‘फडणवीस यांचे विरोधक अमित शाह यांचाही फोन टॅप केला जाईल’; राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई :- महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना ‘सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकले आहेत’ अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी बावनकुळेंवर इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
बावनकुळेंनी गुन्हा कबूल केला
संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या विधानाचा आधार घेत थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोन टॅपिंगची धमकी देत आहेत. हा गंभीर गुन्हा असून त्यांनी फोन टॅपिंग करतो अशी कबुलीच दिली आहे.”
राऊत यांनी हा विषय केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित नसून, विरोधी पक्षाचे फोनही टॅप करून ऐकले जात आहेत, हे बावनकुळे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे, असे म्हटले.
अमित शाह यांचाही फोन टॅप होण्याची भीती
राऊत यांनी या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत अत्यंत गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “उद्या फडणवीस यांचे विरोधक असलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचेही फोन टॅप केले जातील, अशी भीती व्यक्त करतो. अमित शाह हे फडणवीस यांच्याविरोधात आहेत, त्यामुळे ते त्यांचाही फोन टॅप करीत असतील.”
इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी
विरोधी पक्षाचे, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आणि सहकारी पक्षाचे फोन टॅप करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार बावनकुळे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले की, “हा गुन्हा फडणवीस यांना गंभीर वाटत असेल, तर त्यांनी बावनकुळे यांना बडतर्फ करून, गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे.”
फडणवीस यांच्यावर निशाणा
राऊत यांनी 2019 मधील फोन टॅपिंग प्रकरणाची आठवण करून देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “तेव्हाच्या फोन टॅपिंगचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या. हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा गुन्हा होता. मात्र, सरकार बदलल्यामुळे गुन्हेगारांना क्लीन चिट देत त्यांना प्रमोशन देण्यात आले,” असा टोला राऊत यांनी लगावला.
‘पेगॅसिसपेक्षा अद्ययावत मशिन’
राऊत यांनी आरोप केला की, बावनकुळे आणि त्यांची भाजपची टीम (रवींद्र चव्हाण, मुंबईतील काही बिल्डर, नागपूर व पुणे येथील यंत्रणा) यांनी फोन टॅप करण्याचे ‘मशिन्स’ लावले आहेत, ज्यांना ते ‘वॉर रूम’ बोलतात. “हे भाजपचे खासगी व्हिजिलन्स ऑफीस असून तेथून भाजप, शिंदे गट, अजित पवार, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) अशा सर्व पक्षांचे नेते त्यांच्या सर्व्हिलन्सवर आहेत. तेथे पेगॅसिसपेक्षा अद्ययावत मशिन्स आहेत,” असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…