Sanjay Raut On Amit Shah : खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांचा खरपूस समाचार घेतला आहे
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की देशाचे गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री यांच्या प्रेमात जास्त पडल्याचे दिसत आहे. परंतु हे प्रेम नसून अफेर आहे ते कधीही तुटू शकते असा खोचक टोला राऊत यांनी लावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना महायुतीमध्ये कुणी विचारत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी काँग्रेसचे एक नेते होते एस.पी. पाटील त्यांची ख्याती होती की ते मुंबईतून दिल्लीला सर्वात जास्त पैसा देत होते. यांचा रेकॉर्ड शिंदेंनी तोडला आहे.
संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहिण योजना ही राजकीय प्रेरित आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात, त्यांनी झारखंडमध्ये ही योजना राजकीय प्रेरित आहे असे म्हणत असतील तर तो न्याय महाराष्ट्रालाही लागू करायला हवा. अमित शहा यांना मराठी माणूस कमजोर करायचा आहे. 40 टक्के कमीशन खाणारे हे लोक आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांच्यात पटत नाहीये, हरियाणा निवडणुकीचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला असा आरोपही त्यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळात वाद ह्या बातम्यामध्ये बोलणे योग्य नाही. पण महायुतीमध्ये कधीच आलबेलं नव्हते. फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हे सरकार बनवले गेले.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…