मुंबई
Trending

Sanjay Raut : “बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला!” – संजय राऊतांचा शिंदेंवर बोचरा टोला

Sanjay Raut On Eknath Shinde : राज-उद्धव युतीवरून एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष हल्लाबोल; राऊतांनी दिलं परखड उत्तर

मुंबई | शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शुक्रवारी 59 वा वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला असला, तरी त्यानिमित्ताने राजकीय फटाके मात्र एकाच व्यासपीठावर उडत राहिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी या कार्यक्रमात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला चढवला. “हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात करणारे आता माझ्याशी युती करतात का?” Sanjay Raut On Eknath Shinde असे म्हणत त्यांनी दोघांवर टीका केली.

त्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही कोणासोबत युती करावी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ‘बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतो आहे?’ दोन पक्ष एका विचारधारेचे असतील, तर ते युती करतात. त्यामुळे तुमचं तिळपापड का झालं?” असा बोचरा सवाल करत राऊतांनी शिंदेंवर हल्ला चढवला.

संजय राऊतांनी शिंदेंच्या भाषेवरूनही खरमरीत प्रतिक्रिया दिली. “अशी भाषा अघोरी विद्येची आहे. ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं, त्याच्याविरुद्ध बोलताय? शिंदेंची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. दिल्लीला जाऊन बूट चाटेगिरी करताय, ही नव्या संस्कृतीची भाषा आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

यावेळी त्यांनी भाजपने घेतलेल्या राजकीय धोरणांवरही प्रश्न उपस्थित केला. “लोकसभेत तुम्ही मेलेले होता, विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत झाला,” असे म्हणत त्यांनी टीकेचा झडप घातला.

ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही संजय राऊत म्हणाले, “मराठी माणसाची एकजूट ही आमची भूमिका शेवटपर्यंत राहील. ठाकरे ब्रँड हा देशातील सर्वोच्च ब्रँड आहे. तो कोणत्याही भाजपमधील किंवा भाजपपुरस्कृत नेत्याला डॅमेज करता येणार नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0