•Sanjay Patil ठाकरे गटाचे उमेदवार यांच्याकरिता लोकसभेचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा
मुंबई :- ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील Sanjay Patil यांना लोकसभेत जास्त मताधिक्य पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना फुटी नंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यांना निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी संख्याबळाच्या तुलनेने एकनाथ शिंदे यांना दिले.त्यानंतर अनेक माजी-आजी आमदार-खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचा मार्ग स्वीकारला आहे. ठाकरे कडे राहिलेले अनेक निष्ठावान शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या निष्ठेचा गिफ्ट म्हणून संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतून ठाकरे च्या शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याकरिता उमेदवारीचे संधी दिली आहे. संजय दिना पाटील यांना दिलेल्या संधीचे आता ते लवकरच सोन होणार असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे.
भाजपातील अंतर्गत वादाचा संजय दिना पाटील यांना फायदा?
भाजपाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांची उमेदवारी भाजपाने कापत मुलुंड चे आमदार मिहीर कोटेचा यांना संधी दिली आहे. भाजपामध्ये अनेक इच्छुकांची स्पर्धा मोठ्या संख्येत होत होती.अनेकांचे नाव चर्चेत सातत्याने येत होते. भाजपाचे नेते किरीट सोमय्या, माजी मंत्री प्रकाश मेहता, विद्यमान खासदार मनोज कोटक, भाजप आमदार राम कदम, प्रविण छेडा अशा दिग्गज नेत्यांचे भाजपकडून फिल्डिंग लावल्याचे चर्चा होती. किरीट सोमय्या प्रकाश महेता, प्रविण छेडा हे नाराज असल्याचे सातत्याने बोलले जात आहे याचा फटका भाजपाच्या उमेदवाराला होण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे गुजराती मतदार तर दुसरीकडे मराठी मतदार असा सामना यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
मुलुंड-घाटकोपर या परिसरात गुजराती मतदारचा वर्ग सर्वात जास्त असून येथे मोठ्या प्रमाणावर मोदींना मानणारा वर्ग आहे. आमदारकीच्या उमेदवारी पासून नाराज असलेला प्रकाश महेता आहे यांचा गुजराती समाजामध्ये चांगला दबदबा आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाश महेता जास्त सक्रिय नसल्याने घाटकोपरमध्ये मतदानबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर सातत्याने विरोधकांनख अंगावर घेणारे किरीट सोमय्या यंदा निवडणूकी मध्ये जास्त सक्रिय नसल्याने त्याचा फटका भाजपाच्या उमेदवाराला पडू शकतो.
संजय दिना पाटील Sanjay Patil यांचा फार मोठा मतदार वर्ग असून विक्रोळी, मुलुंड पूर्व,भांडुप, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर या विभागात संजय पाटील यांचा चांगला धबधबा असून संजय पाटील सह ठाकरे गटांना मानणारा गट मोठ्या प्रमाणावर आहे. याचा फायदा यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय पाटील यांना होणार आहे. मानखुर्द परिसरात मुस्लिम,तर विक्राळी, घाटकोपर येथे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यांचा फायदा संजय पाटील यांना होऊ शकतो. संजय दिना पाटील यांच्या विजयाकरिता महत्वाचे ठरणार असून यंदाच्या निवडणुकीत संजय पाटील नक्कीच उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची वर्णी लोकसभेत लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लोकसभेच्या क्षेत्रात ठाकरे गटाचे दोन आमदार आहे. तसेच ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांचा निवासस्थानही याच मतदारसंघात असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट संजय दिना पाटील यांच्या वोटिंग वर नक्कीच पडणार आहे.