Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणा, राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून मुंबईतून निवडणूक लढवणार
•राज्यामध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांचे नाव चर्चेत होते. आता ते निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे
नाशिक :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी मोठी घोषणा केली आहे. नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलताना संजय पांडे यांनी मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मी राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभेचे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
हरियाणा आणि जम्मू काश्मीर नंतर महाराष्ट्र आणि इतरत्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. साधारणतः नोव्हेंबर महिन्यानंतरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता खुद्द निवडणूक आयुक्ताने सांगितले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आता राजकीय तयारीला लागून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता दिसत आहे सध्या राज्यात राजकीय वातावरण निवडणुकीमुळे चांगलेच आपले आहे. असे असताना माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पत्रकारांची सव्वा सातत्याने म्हणाले की राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून मुंबईच्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीकरिता तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी या आधी देखील एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असल्याचे सांगितले होते. मात्र कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न नक्की करू, असे संजय पांडे यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यांच्या पोस्टमुळे राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, आता नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय पांडे यांनी थेट चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजय पांडे यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.