क्राईम न्यूजमुंबई
Trending

Sanjay Nirupam : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम आक्रमक, पोलीस ठाण्यात ठिय्या

Sanjay Nirupam On Mumbai Police : दहा वर्षीय मूकबधिर मुलीवर झालेल्या बलात्कार करणाऱ्या आरोपींना शोध घेण्यासाठी विलंब लागल्याने, संजय निरुपम यांच्याकडून पोलिसांना जाब

मुंबई :-शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम Sanjay Nirupam यांनी आंबोली पोलीस ठाण्यात Amboli Police Station ठिय्या मांडला होता. संजय निरुपम हे कार्यकर्त्यासह पोलीस ठाण्याला घेराव घालून वरिष्ठांना जाब विचारला आहे. मे महिन्याच्या 18 तारखेला जोगेश्वरी पश्चिम येथील यादव नगर येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दहा वर्षीय मूकबधिर मुलीवर Rape Case In Jogeshwari झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांकडून विलंब लागल्याने संजय निरुपमाच आक्रमक झाले आहे. यावेळी संजय निरुपम यांनी आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसांची भेट घेऊन तपासाबाबत आढावा घेतला आहे.

संजय निरुपम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दहा वर्षीय मूकबधिर मुलीवर झालेल्या अतिप्रसंगामुळे आज पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे .पोलिसांनी सदर प्रकरणात चौकशी चालू असल्याचे सांगितले माझे म्हणणे एवढेच आहे की,सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यास पोलीस गुजरातमधून आरोपीला तत्काळ अटक करतील, मात्र या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. Sanjay Nirupam Latest News

संजय निरुपम यांनी म्हणाले की, ज्या मुलीवर घटना घडली त्यांच्या ते एक गरीब कुटुंब असल्याने पोलिस तपासात निष्काळजीपणा करत आहेत का, असा सवाल मुलीचे वडील विचारत आहेत. स्कॉटलंड यार्डसारख्या सक्षम समजल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांना एका असहाय बापाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.

पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक केली नाही तर मी हे प्रकरण मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Sanjay Nirupam Latest News

Web Title : Sanjay Nirupam: Leader of Shiv Sena Shinde group Sanjay Nirupam aggressive, stayed at the police station

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0