मुंबई
Trending

Sanjay Nirupam : काँग्रेस नेहमीच…’, राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचा हल्लाबोल

Sanjay Nirupam On Rahul Gandhi : शिंदे गटनेते संजय निरुपम यांनी राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेहमीच आरक्षणविरोधी असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

मुंबई :- काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी प्रतिष्ठित जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल झाला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही. येथे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे किती दिवस सुरू राहणार असा सवाल केला होता.त्यावर ते म्हणाले, “जेव्हा भारतात न्याय्यता (आरक्षणाच्या बाबतीत) येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू.” “यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.”

काय म्हणाले संजय निरुपम?

आता एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. निरुपम म्हणाले, कालच राहुल गांधी यांनी अमेरिकेत विधान केले की जेव्हा भारत न्याय्य असेल तेव्हा आरक्षण रद्द केले जाईल. या विधानावरून काँग्रेसची आरक्षणविरोधी मानसिकता दिसून येते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी संविधान धोक्यात आल्याचे खोटे भाष्य करून जनतेची दिशाभूल केली. राहुल गांधी जे बोलतात ते काँग्रेसमध्ये घडते, हे आम्हाला माहीत आहे. तिथे अध्यक्ष फक्त नावालाच असतो. मी प्रत्येक समाजाला विचारतो की ते सर्व राहुल गांधींच्या विधानाशी सहमत आहेत का.

निरुपम पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षण हा मोठा प्रश्न आहे, मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माझा प्रश्न आहे की ते राहुल गांधींच्या विधानाशी सहमत आहेत का. काँग्रेस नेहमीच आरक्षण विरोधी आहे.

राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून भाजपनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपने केला आणि अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घटनेच्या या तरतुदीविरुद्धचा त्यांचा पक्षपात उघडपणे समोर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0